Loading...
Gandhi Vidyalay Shikshan Sanstha, Kondha
बातमी
5 सप्टेंबर - शिक्षक दिन     14 सप्टेंबर - हिंदी दिवस     14 नोव्हेंबर - बाल दिवस    

मुख्याधापक संदेश

गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढा अंतर्गत संचालित गांधी विद्यालय वलनी (चौ.) ता. पवनी जि. भंडारा ही एक सर्वांगसुंदर शाळा आहे. या शाळेची स्थापना दिनांक: १/७/१९६१ ला झाली असून ग्रामीण परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, दूर शहरात शिक्षणाकरिता परिसरातील पाल्य व पालकांना पायपिट करावी लागू नये हा उदात्त व पवित्र हेतु ही शाळा स्थापनेमागील आहे.

आज शहरातील धनदांडग्या शाळांनाही लाजवेल अश्या भौतिक सुविधांनी आमची शाळा डौलात उभी आहे. १.६० एकर परिसरात दुमजली भव्यदिव्य इमारत, प्रशस्त क्रीडांगण, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, डिजिटल कक्ष, संगणक कक्ष, विविध विषय कक्ष, सी.सी.टीव्ही.कॅमेरे, बायोमॅट्रिक प्रणाली, स्वच्छ स्वयंपाकगृह, स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसे प्रसाधनगृह, शालेय बाग-बगीचा व भव्य परिपूर्ण संरक्षण भिंत, उच्च विद्याविभूषित अध्यापक वर्ग यासारख्या भौतिक सुविधांनी आमची शाळा नटलेली आहे. विशेष म्हणजे विध्यार्थांना सामूहिक कार्यक्रमकरिता सभागृहाची सोय आहे.

आमच्या शाळेतील विध्यार्थी हा केवळ पोपटपंची करणारा निर्माण होवू नये म्हणून विविध कृतीपूर्ण अध्यायनावर भर दिल्या जातो. परीक्षेत किती गुण मिळाले यापेक्षा तो किती गुणवान आहे याकडे लक्ष दिल्या जाते.

अधिक वाचा

सुविधा

प्रयोगशाळा

वेगळी विशाल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संगणक प्रयोगशाळा

ग्रंथालय

वाचन कक्षामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके आणि मासिके उपलब्ध आहेत.

वर्ग कक्ष

नैसर्गिक प्रकाश आणि ऑक्सिजन प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेंटिलेशनसह शाळेत विशाल वर्ग कक्ष आहे

माजी विद्यार्थी, आमच्यात सामील व्हा

Alumni

जर तुम्ही या शाळा किंवा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहात.

येथे क्लिक करा, आमच्यासह सामील व्हा
5 एकूण गावे
25 एकूण कर्मचारी
12 एकूण संगणक
500 एकूण विद्यार्थी