मुख्याधापक संदेश

Principal Image

गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढा अंतर्गत संचालित गांधी विद्यालय वलनी (चौ.) ता. पवनी जि. भंडारा ही एक सर्वांगसुंदर शाळा आहे. या शाळेची स्थापना दिनांक: १/७/१९६१ ला झाली असून ग्रामीण परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, दूर शहरात शिक्षणाकरिता परिसरातील पाल्य व पालकांना पायपिट करावी लागू नये हा उदात्त व पवित्र हेतु ही शाळा स्थापनेमागील आहे.

आज शहरातील धनदांडग्या शाळांनाही लाजवेल अश्या भौतिक सुविधांनी आमची शाळा डौलात उभी आहे. १.६० एकर परिसरात दुमजली भव्यदिव्य इमारत, प्रशस्त क्रीडांगण, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, डिजिटल कक्ष, संगणक कक्ष, विविध विषय कक्ष, सी.सी.टीव्ही.कॅमेरे, बायोमॅट्रिक प्रणाली, स्वच्छ स्वयंपाकगृह, स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसे प्रसाधनगृह, शालेय बाग-बगीचा व भव्य परिपूर्ण संरक्षण भिंत, उच्च विद्याविभूषित अध्यापक वर्ग यासारख्या भौतिक सुविधांनी आमची शाळा नटलेली आहे. विशेष म्हणजे विध्यार्थांना सामूहिक कार्यक्रमकरिता सभागृहाची सोय आहे.

आमच्या शाळेतील विध्यार्थी हा केवळ पोपटपंची करणारा निर्माण होवू नये म्हणून विविध कृतीपूर्ण अध्यायनावर भर दिल्या जातो. परीक्षेत किती गुण मिळाले यापेक्षा तो किती गुणवान आहे याकडे लक्ष दिल्या जाते आणि त्याकरिता विविध उपक्रम राबाविल्या जातात शाळेचे क्रीडा स्पर्धा, कला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी, शैक्षणिक सहल, स्नेहसम्मेलण, ग्रीष्मकालीन शिबिरे, पक्षी निरक्षण, जंगलाभेटी, क्षेत्रभेटी, सामान्यज्ञान व स्पर्धा परीक्षा, अतिरिक्त तासिका, निशुल्क शिकवणी वर्ग, स्पर्धापरीक्षेची जय्य्त तयारी, काव्यलेखन व गीतगायन, मुलाखती, ग्रामस्वच्छता अभियान, श्रमदान शिबिरे, पालकभेटी, विविध शिष्यवृत्ती परीक्षांची सर्वांगीण तयारी करून देणे यासारखे नावीण्य पूर्ण शालांतर्गत उपक्रम राबविले जातात. तसेच जिल्हा, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वाद्विवाद स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, कलास्पर्धा अथवा विविध शाळा बाह्य स्पर्धा व उपक्रम विद्यालयाच्या वतीने राबविले जातात. ग्रामीण मातीमधील विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधने हेच आमच्या शाळेचे अंतिम ध्येय आहे.

आमचे ध्येय

  • 'एकच ध्यास, विद्यार्थांचा सर्वांगीण विकास' हे आमचे मिशन असून अज्ञानातून विज्ञानाकडे या लक्षासह विविध स्पर्धात्मक परीक्षा, शैक्षणिक उपक्रम, शिक्षक आपल्या दारी, शिक्षणाची वारी, वेळोवेळी चर्चासत्रे व कृतीसत्र या सारख्या दर्जेदार उपक्रमासह विद्यार्थी व शाळेचा नावलौकिक करण्याचं आमचं मिशन आहे.

आमचं दृष्टीकोन

  • ग्रामीण परिसरातील विध्यार्थी शिक्षणणापर्यंत पोहचू शकला नाही तर शिक्षण विद्यार्थ्यांप्रत पोहचवून त्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रत पोहचवून त्यांना शहरी विद्यार्थांच्या तुलनेत स्पर्धात्मक, गुणात्मक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे हा आमच्या शाळेचा दृष्टी कोण आहे.
मुख्याधापक
- J.B. Borkute